विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरेंचे जबरदस्त प्लँनिंग ; पुणे अन् दिल्ली दौऱ्याच्या तारखा आल्या समोर

Uddhav Thackeray Maharashtra tour । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच महत्त्वाचे पक्ष कामाला लागल्याचे दिसत आहे. आपल्या पक्षाकडून सक्षम उमेदवाराची निवड, ताकदीच्या मतदारसंघाची निवड करण्यासाठी सर्वपक्ष खटाटोप करताना दिसून येत आहेत. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत चांगले यश मिळल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी पुढच्या महिन्यात राज्य आणि केंद्राचा दौरा करण्याचे योजिले असल्याचे समोर आले आहे. एवढंच नाही तर त्यांच्या या दौऱ्याच्या तारखा देखील समोर आल्या आहे. उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात तीन आणि चार तारखेला पुणे आणि दिल्लीचा दौरा करणार आहेत.
चार ऑगस्टला दिल्लीचा दौरा Uddhav Thackeray Maharashtra tour ।
आपल्या पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह राज्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. ते आगामी काळात जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधणार आहेत. त्यासाठी ठाकरे यांनी दौरे चालू केले आहेत. प्राप्त माहितीनुसार उद्धव ठाकरे हे 3 ऑगस्ट रोजी पुण्याचा आणि त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी दिल्लीचा दौरा करणार आहेत.
अनेक पदाधिकारी राहणार उपस्थित Uddhav Thackeray Maharashtra tour ।
ठाकरे गटाकडून 3 ऑगस्ट रोजी पुण्यात पदाधिकाऱ्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाल ठाकरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराला पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला महत्त्व
हा दौरा झाल्यानंतर लगेच 4 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्लीचा दौरा करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ठाकरे कोणाची भेट घेणार, या दिल्ली दौऱ्याचा नेमका विषय काय? हे अद्याप समजू शकले नाही. मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या या दौऱ्यांना विशेष महत्त्व आले आहे.





