उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाड्यात! ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्यांशी संवाद

Uddhav Thackeray | शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन राज्य सरकारला विरोधकांनी चांगलेच लक्ष केले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते होते. मात्र अनेक शेतकऱ्यांपर्यंत कोणतीही मदत पोहचली नाही. त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारातच गेली.
यापार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौरा करणार आहे. ‘दगाबाज रे’ या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ते शेतकर्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली.
पत्रकार परिषदेत माजी विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की, “अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने ३१ हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा केली. दिवाळीपूर्वी ते पॅकेजचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार होते. मात्र सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयाही दिला नाही. शिवाय जमीन खरडून गेली, घरेदारे वाहून गेली त्याची मदत अद्याप मिळाली नाही.” त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे मराठवाडयातील गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार
सरकारने जाहीर केलेले पॅकेज, नुकसानभरपाईची रक्कम मिळाली की नाही याची माहिती ते घेणार आहेत. याआधी 25 सप्टेंबर रोजी मराठवाडयातील पूरग्रस्त भागांचा दौरा करत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला होता व त्यांना धीर दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या भागांचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरवात बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होईल. या दौऱ्यात ते सुमारे ३४ तालुक्यातील विविध गावांत शेतकऱ्यांशी संवाद साधतील असेही दानवे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा:





