Uddhav Thackeray : खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; उद्यापासून बंडखोरांच्या….
Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता बचावात्मक पवित्रा सोडून थेट आक्रमक चढाई सुरू केली आहे.

Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यानंतर आता त्यांनी राज्यभर दौऱ्याची घोषणा केली असून, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांपासूनच या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे यांचा पहिला दौरा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून होणार आहे. उद्या सायंकाळी ६ वाजता भांडुप येथे ते शिवसेनेच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेणार आहेत. (Uddhav Thackeray)
बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात विशेष दौरा
खासदारांच्या फुटीनंतर पक्ष मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी २७, २८ आणि २९ जून रोजी राज्यव्यापी दौरा आखला आहे. या दौऱ्यात ते बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. (Uddhav Thackeray)
२७ जून – यवतमाळ आणि हिंगोली
२८ जून – परभणी आणि धाराशिव
२९ जून – शिर्डी
याशिवाय ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांमध्येही संघटनात्मक बैठका आणि कार्यकर्त्यांशी संवाद होणार आहे.
धाराशिव बैठकीत कार्यकर्त्यांना संदेश
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना स्पष्ट संदेश दिला. “जे गेले त्यांचा विचार करत बसू नका. पुन्हा जोमाने कामाला लागा, संघटना मजबूत करा. संघर्ष करण्याची तयारी असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घ्या,” असे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती माजी आमदार रमेश कोरगावकर यांनी दिली. (Uddhav Thackeray)
‘भाजपविरोधात निवडून आले, मग पक्ष सोडण्याचा अधिकार नव्हता’
रमेश कोरगावकर म्हणाले की, शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून अनेक उमेदवारांना निवडून आणले. भाजपविरोधात निवडून आलेल्या खासदारांनी पक्ष सोडणे योग्य नसल्याचा निषेध कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. तसेच आता पक्षप्रमुख स्वतः मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Uddhav Thackeray)





