उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल ; अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती समोर

Uddhav Thackeray । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सकाळपासून एच एन रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झालेत. हृदयामधील हार्ट ब्लॉकेज तपासण्यासाठी रिलायन्स रुग्णालयात चेअकअप केलं जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी, दसरा मेळाव्यापासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुखांची तब्येत ठीक नव्हती. त्यानंतर त्यांना आज तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचे आढळून आले असल्याचे सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता हार्टमधील ब्लॉकेज डॉक्टर तपासात असल्याची माहिती आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
दसरा मेळाव्यातून सत्ताधाऱ्यांवर टीका Uddhav Thackeray ।
दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी दसरा मेळाव्यातून घणाघाती प्रहार केला होता. काल सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून तोफ डागली होती. उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करू, असे म्हटले आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीला ही निविदा प्राप्त झाली आहे.
मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सरकार धारावीच्या माध्यमातून मुंबईला लुटण्याचा प्रयत्न करत आहे. अदानींना काय दिले नाही? सारी जमीन अदानींची होत आहे. मुंबई आम्हाला अदानीने दिलेली नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लढून आपण हे साध्य केले आहे. मी स्वतःसाठी लढत नाही. मी मुंबईसाठी लढत आहे. माझे सरकार येताच मी धारावीची निविदा रद्द करेन.”असे म्हटले होते.
राहुल गांधी महाराष्ट्रात कोणत्याही बदलाच्या तयारीत नाहीत Uddhav Thackeray ।
राहुल गांधी सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये कोणताही निर्णय किंवा बदल करू इच्छित नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असतील असंच राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना सूचित केल्याचे त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून ही बाब जाहीरपणे सांगण्यात यावी आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी ठाकरे गटाकडून होत आहे. मात्र काँग्रेसला याला विरोध असल्याचा आदेश रावल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा
महाराष्ट्रात भाजप किती जागा लढवणार? ; ही मोठी बातमी आली समोर, वाचा सविस्तर





