Satara | नंबर एकला ओन्ली शिवेंद्रसिंहराजेच पाहिजेत

सातारा, (प्रतिनिधी)- आमच् दोघांमधील संघर्ष संपला आहे, अशी ग्वाही देत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्याच्या विकासात आम्ही कोठेही कमी पडणार नाही अशी हमी दिल्यानंतर येथील गांधी मैदानावर काल टाळ्यांचा कडकडाट झाला.
पुष्पा चित्रपटातल्या डायलॉगप्रमाणे ‘हम दोनो कभी झुकेगा नाही‘, अन्यायाच्या पुढे झुकणार नाही त्यामुळे शिवेदंर्सिंहराजे यांना आता मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा. आम्हा दोघांना तुमची सेवा करायची आहे. मागच्या वेळी शिवेंद्रसिंहराजे दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आले. पण यावेळी महाराष्ट्रात नंबर एकला ओन्ली शिवेंद्रसिंहराजे निवडून आले पाहिजेत, असे आवाहन उदयनराजे यांनी केले. येथील गांधी मैदानावर महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सांगता सभेत उदयनराजे बोलत होते.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, विट्ठल बलशेटवार, अविनाश कदम, लोकसभा संयोजक सुनील काटकर, अमोल मोहिते, अशोक मोने, ॲड. दत्ता बनकर, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर तसेच सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीचे सदस्य उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, सातारा मराठ्यांची राजधानी आहे. येथे अनेक चळवळी उदयाला आल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे व मला राजघराण्याचा वारसा लाभला आहे. मतदारांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आम्ही दोघेही लोकप्रतिनिधी म्हणून आपली सेवा करण्यास बद्ध आहोत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे बोलण्यासारखं काहीच नाही. महायुतीच्या कारभाराने त्यांना बोलण्यासाठी शब्दच ठेवला नाही. विरोधकांचे ध्येय फक्त अफवा पसरवून सत्ता हस्तगत करणे इतकेच आहे. त्यापलीकडे काही नाही.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे.सातार जावळी मतदारसंघात काम करताना माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आज येथे लाडक्या बहिणी एकट्या आल्या असल्या तरी घरातील चार मते घेऊन आल्या आहेत. माझ्या विजयाच्या खऱ्या अर्थाने त्या शिल्पकार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेले हे ठिकाण आहे. त्याचबरोबर अभयसिंहराजे यांनी घालून दिलेला वारसा जपण्याचे काम आम्ही सातत्याने करत असतो. सातारा भाजपचा बालेकिल्ला बनवा, आता सर्वांच्या माध्यमातून विजयाची घोडदौड सुरू आहे, त्यामुळे पाच वर्षात विकासाची घौडदौड तुम्हाला दिसून येईल. माझ्या दृष्टीने मंत्रिपद महत्त्वाचे नाही. मंत्रिपदापेक्षाही चांगली कामे केलेली आहेत. भविष्यात मंत्रिपद मिळाले तर अधिक चांगले काम करता येईल. यापुढील काळात मी सतत आपल्याबरोबर असणार आहे.
सातारा आणि जावळीत पर्यटन वाढीसाठी नवीन महाबळेश्वर योजना प्रकल्प सुरू आहे. बाहेरून आलेले पर्यटक साताऱ्यात आले पाहिजेत, येथे व्यवसायवृद्धी झाली पाहिजे. आज माझ्यामागे तरुणाईची शक्ती दिसत आहे. कारण त्यांना दिलेला वेळ आणि प्रेम याच्यामुळे आहे. दि. 23 नोव्हेंबर रोजी होणारी सभा विजयाच्या गुलालाची असेल ही खात्री आहे. उदयनराजे आणि माझ्यात संघर्ष होता. पण देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बसून ते वाद मिटवले आहेत. राजे देवेंद्र यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विकास निधी येणार आहे. बामणोली येथे पाच कोटीची तर नागठाणे ते वीस कोटींची वीज बिले माफ झाली. त्यामुळे त्या वीस तारखेला महायुतीच्या उमेदवारांना विजयी करायचे आहे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
गद्दार शब्द पवार यांच्या ज्येष्ठत्वाला न शोभणारा
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार राजकारणामध्ये अनुभवाने ज्येष्ठ आहेत. मात्र, त्यांनी वाई येथील सभेत वापरलेला गद्दार हा शब्द वापरला हे चुकीचे आहे, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. शरद पवार यांनी हा शब्द कोणत्या आधारे वापरला, त्यांना असे शब्द वापरणे शोभत नाही, गेल्या साठ वर्षांत ज्यांनी थापा मारल्या ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे आता उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेली विकास कामे शोधत आहेत, असे त्यांनी सांगितले.
One attachment
• Scanned by Gmail





