Uday Samant : ठाकरेंच्या आरोपांना मंत्री उदय सामंतांनी दिले खोचक प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर (Uday Samant) जोरदार टीका केली. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची दोस्ती पक्की आहे. उद्धव ठाकरे बालिशपणा करत आहेत, शिवसेना खरी कोणाची? हे न्यायालयाने आधीच सिद्ध केलं आहे. आम्ही 80 जागा लढलो 60 जागा जिंकलो, ते फक्त 20 जागाच जिंकले, त्यांच्या हातात आता काही राहिलं नाही, ते काँग्रेसच्या तालावर नाचत आहेत अशी टीका उदय सामंत यांनी यावेळी केली.
हे पण वाचा : EPFमधून पैसे काढणं झालं सोपं; सरकारने सांगितल्या नव्या सोयी
काँग्रेसबरोबर जाऊन त्यांनी बाळासाहेब यांच्यासोबत गद्दारी केली. सौगात हा मोदींचा उपक्रम आहे. यांनी फेक नरेटीव्ही सेट केला आहे. आम्ही पाकिस्तानचं समर्थन करत नाही, यांनी कंगनाच्या घरावर कारवाईसाठी बुलडोझर पाठवला. राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवले. यांनी जे कृत्य केले ते पुसले जाणार नाहीत असे उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.





