Maharashtra Politics : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; राष्ट्रवादी, मनसेलाही धक्का
Maharashtra Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांमधील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि बहुजन हक्क अभियानातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. (Maharashtra Politics)
मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)
बार्शीत १३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुढाकाराने बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुजाता डोळसे, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह तब्बल १३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. (Maharashtra Politics)
यामध्ये धायटीचे सरपंच, तालुका अध्यक्ष रवीभाऊ मेटकरी, जिल्हा परिषद सभापती बंडू मोटे, मनोज ढोबळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. (Maharashtra Politics)
उबाठा गटातील पदाधिकारीही शिवसेनेत
बार्शीतील उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन हक्क अभियानाचे तालुकाध्यक्ष सचिन पालखे, श्रीकांत गायकवाड, दर्शन देशमुख, महिला अध्यक्ष बबिता मोकाशी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Maharashtra Politics)
चंद्रपूरमध्येही संघटनविस्तार
चंद्रपूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, जिवती नगर परिषदेचे नगरसेवक मारुती भुमरे यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे चंद्रपूरमध्येही शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र आहे. (Maharashtra Politics)
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही हाती घेतला भगवा
आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकाराने मुंबईतील मनसेचे माजी सरचिटणीस संतान फर्नांडिस, विभाग अध्यक्ष अमृत जावळे, फिटनेस ट्रेनर मनीष अडविलकर आणि महिला बॉडीबिल्डर दीपा सप्रे यांच्यासह मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Maharashtra Politics)
याशिवाय ईशान्य मुंबईतील सोशल मीडिया पदाधिकारी, केबल व्यवसायाशी संबंधित पदाधिकारी तसेच मर्चंट नेव्ही क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. (Maharashtra Politics)
पनवेलमध्ये शेकापला धक्का
पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस बाबा नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शेकापचे जनरल सेक्रेटरी अशोक नाईक, प्रदीप पटेल, अनिल माने, विकास जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. (Maharashtra Politics)
राज्यातील विविध भागांतील स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळाल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशांना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : महाराष्ट्रावर शोककळा..! माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन
Maharashtra Politics : शिंदेच टेन्शन वाढलं ! 6 खासदारांच्या बंडखोरीबाबत सुप्रीम कोर्टाचं मोठं पाऊल






