#U19CWC : दुखापतग्रस्त दिव्यांशच्या जागी सिध्देशची निवड

मुंबई : आगामी १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये दुखापतग्रस्त दिव्यांश जोशीच्या जागी सिध्देश वीरची निवड करण्यात आली आहे. सिध्देश अष्टपैलू खेळाडू आहे आणि महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो.
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिव्याशांच्या उजव्या खांद्यास दुखापत झाली होती.
सिध्देशने गुरूवारी झालेल्या चौरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूध्द ३७ चेंडूत ४८ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे भारताची धावसंख्या २५९ पर्यंत पोहचली होती. सिध्देश या सामन्यात १ गडी देखील बाद केला होता. ही चौरंगी मालिका भारताने जिंकली होती.
१९ वर्षाखालील विश्वचषक १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. भारताचा पहिला सामना १९ जानेवारी रोजी श्रीलंकेविरूध्द होईल.
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रूव चंद जुरेल, शाश्वत रावत, सिध्देश वीर, शुभंग हेगडे, रवी बिश्णोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र, सुशांत मेहरा आणि विद्याधर पाटील.





