#U19CWC : पाकच्या १९ वर्षाखालील संघातून नसीमला वगळले

कराची : पाकिस्तानने युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह याचं नाव १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतून मागे घेतले आहे. श्रीलंकेविरूध्दच्या कसोटी मालिकेतील त्याची शानदार कामगिरी पाहता तो वरिष्ठ संघात खेळण्यास सज्ज असल्याचे कारण पाकिस्तान क्रिकेटकडून देण्यात आले आहे.
https://twitter.com/TheRealPCBMedia/status/1212054100550078466?s=19
पाक ज्युनियर संघाचे प्रशिक्षक एजाज अहमद यांच्या सांगण्यावरून १९ वर्षाखालील संघात नसीमचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आॅस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरूध्दच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत नसीमने उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली.
त्यामुळे पाक संघाचे प्रशिक्षक मिस्बा-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस तसेच पीसीबीचे सीईओ वसीम खान यांनी नसीम शाह याला ज्युनियर विश्वचषकाच्या संघातून वगळण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे आता नसीम शाहच्या जागी ज्युनियर महंमद वसीमची निवड करण्यात आली आहे. ज्युनियर विश्वचषक क्रिकेट स्पर्धा १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणार आहे.





