U-19 World Boxing Championships 2024 : कृषा वर्माचा सुवर्णपंच तर अन्य 5 बॉक्सरांची रौप्य पदकावर मोहर…

U-19 World Boxing Championships 2024 : युवा भारतीय बॉक्सर कृषा वर्मा हिने महिलांच्या 75 किलो गटात सुवर्णपदक जिंकले तर इतर पाच बॉक्सरनी कोलोरॅडो, यूएसए येथे जागतिक बॉक्सिंगद्वारे आयोजित केलेल्या अंडर-19 जागतिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.कृषा वर्मा हिनं 75 किलो गटाच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या सायमन लेरिकाचा 5-0 असा पराभव केला.
Krisha Verma wins Gold🥇in the Women’s 75 kg division at the first ever World Boxing U19 World Championships,with a unanimous decision win in the finals.
5 other Indian boxers lost their final bouts and had to settle for🥈#Boxing pic.twitter.com/e2gg0gK5Xn
— Rambo (@monster_zero123) November 2, 2024
चंचल चौधरी (महिला 48 किलो), अंजली कुमारी सिंग (महिला 57 किलो), विनी (महिला 60 किलो), आकांक्षा फलसवाल (महिला 70 किलो) आणि राहुल कुंडू (पुरुष 75 किलो) यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावं लागले.
चंचलने अपात्र ठरल्यानंतर दुसरे स्थान पटकावले तर अंजलीला इंग्लंडच्या मिया-टिया आयटनकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला. आकांक्षाला इंग्लंडच्या लिली डीकॉनकडून पराभव पत्करावा लागला तर राहुलला अमेरिकेच्या अविनोंग्या जोसेफकडून 1-4 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. विनीला इंग्लंडच्या एला लोन्सडेलकडून 2-3 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.
जागतिक बॉक्सिंगची ही पहिलीच जागतिक स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (IBA) च्या जागी बॉक्सिंगची जागतिक प्रशासकीय संस्था म्हणून ऑलिम्पिक चळवळीत बॉक्सिंगचे स्थान सुरक्षित करण्यासाठी जागतिक बॉक्सिंग सुरू करण्यात आली आहे.





