पंढरपूर: श्रीगणेशाचे विसर्जन करण्यासाठी गेलेले 2 तरुण जुन्या दगडी पुलाजवळ बुडाले. यातील एकाला येथील नागरिकांनी वाचिविले, तर दुसरा तरूण वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. बुरुड गल्लीतील तरुण जयवंत मोरे व दिनेश साळुंखे हे गणेश विसर्जनासाठी भीमा नदीवरील जुना दगडी पूल येथे गेले होते. यावेळी तोल जावून ते नदीत पडले. यामध्ये जयवंत मोरे हा तरूण वाहून गेला, तर दिनेश साळुंखे यास नागरिकांनी वाचविले. बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे.