खालापूर : इरशालवाडीवर दरड कोसळ्याने अनेक माणसे ढिगाऱ्या खाली गाडली गेली. डोळ्यादेखत आपली आई, मुलगा, वडील हे दरडखाली गाडले जात असताना काळीज पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगाला आज दोन वर्ष पूर्ण झालेत श्रध्दाजंली आहेत. शनिवार दि.19 जुलै रोजी श्रंध्दाजंली कार्यक्रमाला खालापूर तहसिलदार, नायब तहसिलदार यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांनी दांडी मारली आहे, तर राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा भेट घेवून नोकरी आणि मदतीचे अश्वासन दिले होते, तेही हवेत विरघळून गेल्याचा संताप दरडग्रस्तांनी व्यक्त केला. तर तात्कालीन तहसिलदार आयुब तांबोली हेच आमचे मायबाप होते असे सांगत अश्रू अनावरण झाले. दुर्घटना घडल्यानंतर मदतीसाठीचा ओघ फक्त फोटो सेक्शनसाठी होता असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. इरसालवाडीचा डोंगर 19 जुलै 2023 रोजीच्या रात्री कोसळून भुस्सखलन झाल्याने आणि 84 जणांना प्राण गमवावा लागला आहे. घरे, जनावरे सर्व मातीखाली गाडले गेल्याच्या दुर्घटनेला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. दुर्घटना घडल्यानंतर वर्षभर तहसिलदार आयुब तांबोली, नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी पालकत्व स्विकारून पक्के घरे उभारण्यासाठी काम केले. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अनेकवेळा भेट घेवून कुटूंबांना धीर देत रोजगार उपलब्ध करण्याचे अश्वासन दिले होते. इरशालवाडी दरडग्रस्त गावात घरं बांधली, पाणी, रस्ता, विज दिली मात्र रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामध्ये विजेचा बिल भरताना नाकेनऊ आले आहेत. दुसऱ्या वर्ष श्राद्धात अश्रूंचा बांध फुटला आहे. दुर्घटनेतील मृतांना दुसऱ्यावर्षी श्रध्दाजली कार्यक्रमासाठीचे निमंत्रण शासकीय अधिकाऱ्याना देण्यात आले असताना दांडी मारली आहे. तर यावर्षी श्रद्धांजली वाहण्यासाठी खालापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलिस उप निरीक्षक विशाल पवार,अशोक जगताप, पोलिस दिनेश भोइर, देवेंद्र शिंनगारे, बबन घुले, शरद हिवाळे पोलिस,अपघातग्रस्त टिमचे गुरूनाथ साठेलकर तसेच नेताजी पालकर मंडळ चौकचे संघटक यशवंत सकपाळ, रंजना साखरे, अशोक मोरे, बन्सी घेवडे, अनंता पवार, फिरोझ शेख, हर्षल हनुमंते, आनंद गायकवाड, महाराष्ट्र दुर्ग पर्यटन संस्था अध्यक्ष रूपेश तरल, प्रवीण पाटील, श्रेयस सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते विजय ठोसर, स्वप्निल सोनटक्के तसेच ग्रामस्थ अंकुश वाघ, गणपत पारधी, सुनील पारधी, भगवान भवर, सचिन पारधी, मंगळू पारधी, महादेव सुतक, कमलू पारधी आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी नेताजी पालकर मंडळ चौकच्या वतीने रामा पारधी, अशोक भुतबरा, वामन भुतबरा, गणेश भवर, अंजनी भवर, नरेश पारधी, किसन वाघ, पर्वत पारधी या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनीही मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना धीर दिला आहे. श्रध्दाजंली कार्यक्रमाला खालापूर तहसिलदार, नायब तहसिलदार यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांनी दांडी मारली आहे. राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा भेट घेवून नोकरी आणि मदतीचे अश्वासन दिले होते ते पूर्ण न झाल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.