पिंपरी | गटारीची भिंत पडून दोन कामागारांचा मृत्यू

पिंपरी, (प्रतिनिधी) – गटारीचे सुरु असलेल्या बांधकामाची भिंत पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर, एका कामगार जखमी झाला. ही घटना १ जून २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास नवलाख उंब्रेगावच्या हद्दीत तळेगाव इंडस्ट्रीयल पार्क येथे घडली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
रघुनाथ बसांवत साहु, शंकर किस्तापा राठोड अशी मृतांची नावे आहेत. याबाबत गंभीर जखमी झालेल्या अमरेश उमापती चव्हाण (वय २८, रा. म्हाळसकर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, मुळ, रा. कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन मोनेश व्यंकटेश पवार (वय २९, रा. वडगाव शेरी, धायरी, पुणे, मुळ, रा. रायचुर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गटारीचे बांधकाम सुरू असताना आरोपीने कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. तसेच अपघात घडू नये यासाठी कोणतीच खबरदारी घेतली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक निरेळेकर करत आहेत.





