शिरुरमध्ये दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट! तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी; अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

शिरूर: गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असून, तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरी करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या तीनही घटनांची नोंद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
पहिली घटना करडे येथे कारेगाव चौक येथे घडली. दि. ०७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास फिर्यादी राजू रामाजी जाधव यांनी आपली होडा शाईन कंपनीची मोटरसायकल भैरवनाथ टी सेंटर समोर पार्क केली होती. काही वेळातच अज्ञात चोरट्याने ती मोटरसायकल चोरून नेली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना दि. १० एप्रिल २०२५ रोजी रात्री १० ते ११ एप्रिलच्या सकाळी ४ या वेळेत मौजे पिंपरखेड येथील घरासमोरील अंगणातून घडली. संदीप रामदास गायकवाड यांच्या मालकीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल चोरीस गेली.
तिसरी घटना दि. ०९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ते १० वाजेच्या दरम्यान टाकळी हाजी येथे घडली. फिर्यादी सुनील गणपत सदाफुले यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेतून होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल चोरीस गेली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन
तिन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. शिरूर परिसरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. नागरिकांनी आपापल्या गाड्या सीसीटीव्हीच्या निगरानीखाली पार्क करण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे





