आळंदी – सराईत दुचाकी चोरास आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या हिरो होंडा (एम.एच. 12, डी.एक्स 7514), अॅक्टीवा (एम.एच.14 , एच.वाय. 3655), हिरो डिलक्स (एम.एच.14 , ई. एल. 5348) अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ओंकार तवार (वय 24, रा. तापकीर वस्ती चऱ्होली खुर्द, खेड. मूळ संभाजीनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी घरफोडी, दुचाकी चोरी व मालमत्ते विरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भिमा नरके यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पो. हवा. लोणकर, पो.शि. खेडकर, पो.शि. दहिफळे पेट्रोलिंग करताना हनुमानवाडी केळगाव येथील कारवा धर्मशाळेजवळ एक इसम हिरो होंडा कंपनीची दुचाकी हाॅटेलवर पैसे नसल्याचे कारण सांगून विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी जावून पाहणी केली. सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस स्टेशनला आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी 20 दिवसांपूर्वी चऱ्होली खुर्द येथील हाॅटेल चिंचगारवा समोरून चोरी केल्याची कबुली दिली. अधिक तपास केला असता दोन तीन महिन्यांपूर्वी आणखी दोन दुचाकी चोरल्याचे सांगितले. आळंदी पोलीस ठाण्यात नोंद तीन दुचाकी चोरी उघडकीस आल्या आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महानवर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 डाॅ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शनाखाली आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके, तपास पथकातील स.पो.नि अनिल लोहार, पो.हवा. राजाराम लोणकर, पो.हवा. वहील, पो. हवा. अनिल गोरड, पो.ना. बाजीराव सानप, पो.शि. विकास पालवे, पो.शि. रवि खेडकर, पो.शि. गजानन आढे, पो.शि. अनिल राक्षे, पो.शि. नारायण सुर्यवंशी, पो.शि. रामदास दहिफळे यांच्या पथकाने केली.