Alandi Crime Bullet theft: घरासमोरून बुलेट चोरी
Updated On:

आळंदी, – येथील काॅंसमाॅस बॅंकेजवळील राहत्या घरासमोरून बुलेट दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली. शुक्रवार (दि. 27 सप्टें.) सायंकाळी सात वाजतापासून ते रविवार (दि. 29) सकाळी 11 वाजेच्या दरम्यान चोरी झाली. याप्रकरणी हर्ष संजय भोसले (वय 19, रा. काॅसमाॅस बॅंक शेजारी, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) यांने फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काॅंसमाॅस बॅंक जवळ घरासमोर काळ्या रंगाची स्टॅंडर्ड 350 ईएसआय बुलेट मोटार सायकल (एम.ए. 14 के.पी. 0065) लाॅक करून पार्क केली होती. कोणीतरी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ती चोरून नेली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.





