काश्मीरात 24 तासांत दोन दहशतवादी हल्ले

श्रीरीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत काश्मीरात दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची ही दुसरी घटना आहे.
आजची घटना पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा येथे घडली. तेथे आज दुपारी 12.45 च्या सुमारास मुकेश सिंग नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यात तो मरण पावला. तो मुळचा उत्तरप्रदेशातील रहिवासी आहे. या आधीच्या घटनेत श्रीनगरच्या ईदगाह भागात दहशतवाद्यांनी एका पोलिस अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
पोलिस निरीक्षक मसरूर अहमद वानी असे यात जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते ईदगाह मैदानावर स्थानिकांसोबत क्रिकेट खेळत असताना त्यांच्यावर तीन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या.हल्लेखोर नंतर पळून गेले. त्यांचा अजून शोध लागलेला नसतानाच आज अशा प्रकारची आणखी एक घटना घडली आहे.





