स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळले
Updated On:

पुणे – मागील दोन दिवसांपासून हवामानात बदल होत आहेत. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, सांधेदुखी अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले असून, खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रात्री आणि पहाटे थंडी, साधारण नऊ वाजेपर्यंत ही थंडी जाणवत असून, दुपारी ढगाळ वातावरणामुळे अंगदुखी, अस्थमा असलेल्या व्यक्तींना त्रास होत आहे. तर सायंकाळी पुन्हा थंडीचा कडाका वाढत असल्यामुळे साहजिकच उन्हाचा चटका कमी झाला.





