सातारा – सातारा शहरातील कमानी हौद परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सापळा रचून दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली. धनंजय राजेंद्र पंडित, रा. शनिवार पेठ व राजेश गणेश वंजारी 45 गुरूवार पेठ सातारा या दोघांकडून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार चोरीच्या मोटार सायकल घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली होती.
स्थागुषाच्या पथकाने कमानी हौद परिसरात सापळा रचून वाहनासह दोन इसम संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले. सातारा तालुका व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन पस्तीस हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली चोरल्याचे त्यांनी कबुल केले. पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विशाल पवार, चालक संजय जाधव यांनी कारवाईत भाग घेतला.