पोलिसांच्या गोळीबारात 2 कुख्यात गुंड जखमी
Updated On:

कोल्हापूर : कोल्हापूरात पोलीस आणि राजस्थान च्या मोस्ट वोन्टेड गुंडांमध्ये चकमक उडाली आहे. एकमेकांकडून जोरदार गोळीबारा मुळे एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जवळील किणी टोल नाक्यावर ही घटना घडलीय.
पोलिसांच्या गोळीबाराच्या राजस्थानी गुंडाच्या टोळीतील दोघे गंभीर जण जखमी झाले तर गुंडाच्या गोळीबारात स्वतः वाचवताना एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालाय.जखमींवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
कोल्हापूर पोलिस आणि वाँटेड गँगस्टर यांच्यादरम्यान झालेल्या गोळीबाराने कोल्हापूर जवळचा किणी टोल नाक्याचा परिसर थरारला आहे. मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. या घटनेने टोल नाका परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण होते.
या धुमश्चक्रीत धुमश्चकीत शामलाल गोवरधन वैष्णोई (वय 22 रा. बीयासर, भैयासर, जोधपुर राजस्थान) , सरवनकुमार मनोहरलाल मान्जु वैष्णोई (वय 24 रा. विष्णुनगर, बाखरी ता. आसीया जि.जोधपुर राजस्थान ) हे दोघे गँगस्टर गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या श्रीराम पांचाराम वैष्णोई (वय 23 रा.बटेलाई जोधपुर राजस्थान) तिसऱ्या साथीदाराला पोलिसांनी झडप घालून पकडले. या घटनेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस कर्मचारी पांडुरंग तुकाराम पाटील (वय ४५) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
राजस्थानमधील गँगस्टर श्यामलाल वैष्णोई, सरवनकुमार वैष्णोई आणि त्यांच्या साथीदारांचा कर्नाटक पोलिस आणि राजस्थान पोलीस शोध घेत होते. तिघेही गुन्हेगार कर्नाटकातून राजस्थानला जात असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली होती.
कर्नाटक पोलिस आणि राजस्थान पोलीस त्यांच्या मागावर असताना गुन्हेगारांनी बेळगावमधून कोल्हापूरकडे कूच केल्याची माहिती त्यांना मिळाली. कर्नाटक पोलिसांनी तातडीने कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने हालचाली करत राष्ट्रीय महामार्गावर पथके पाठवली.
तसेच किणी टोल नाक्यावर गस्त सुरू करत वाहनांची कसून तपासणी सुरू केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिसही किणी टोलनाक्यावर टेहळणी करत होते. रात्री नऊ वाजल्यापासून वाहनांची तपासणी सुरू असताना गुन्हेगार सावध झाले. पोलिस त्यांच्या कारची तपासणी करत असतानाच त्यांनी दुभाजक तोडून दुसऱ्या मार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
कार थांबल्याने तिघेही कारच्या बाहेर उतरले. त्यांनी पोलिसांवर बंदुकीतून गोळीबार सुरू केला. पोलिसांनी सुरक्षित आडोसा घेत गोळीबार सुरू केला. पोलिसांच्या गोळीबारात श्यामलाल आणि सरवन दोघेही जखमी झाल्याने रस्त्यावर कोसळले. तसेच श्रीराम बिष्णोईला झडप टाकून पकडले. जखमी दोघांना सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल केले.
श्यामलालच्या पायात तीन गोळ्या घुसल्या असून सरवनच्या टाचेला गोळी चाटून गेली आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी धाव घेत कारवाईची माहिती घेतली. या घटनेमुळे टोल नाका परिसरात तणाव निर्माण झाला होता.





