पालघरमध्ये वीज पडून दोघे ठार
Updated On:

पालघर – पालघर जिल्ह्यात वीज अंगावर पडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन जण ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वाडा आणि डहाणू या दोन तालुक्यांमध्ये हे प्रकार घडले.
वाडा तालुक्यातील नामपाडा येथे नितेश तुंबाडा नावाचा एक 20 वर्षीय युवक अंगावर वीज पडून मरण पावला तर दुसरा एक जण जखमी झाला.
डहाणू येथील घटनेत अंबिस्ते खुर्द गावात वीज पडून शांताराम दिवा नावाचा 17 वर्षीय युवक दगावला तर अन्य चार जण जखमी झाले.
पालघर तालुक्यात गेले काही दिवस विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यातील सर्वच ओढे नाले दुथडी भरून वाहात आहेत. पावसामुळे अन्यही नुकसान बरेच झाले आहे.





