औरंगाबादमध्ये कारच्या धडकेत दोघींचा मृत्यू
Updated On:

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना महामार्गावर धूत रुग्णालयासमोर भीषण अपघात झाला आहे. रुग्णालयासमोरच भरधाव कारने तीन पादचारी महिलांना जोरदार धडक देत उडवले.
या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला जखमी आहे. हा अपघात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याची माहिती समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, या तीनही महिला रुग्णालयात, रुग्णाला पाहायला जात असतानाच हा अपघात झाला. याप्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.





