पुणे जिल्हा | वाल्ह्यात पालखी सोहळ्यासाठी दोन हिरकणी कक्ष

वाल्हे, (वार्ताहर) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वाल्हे (ता. पुरंदर) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत दोन हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
दरम्यान, हिरकणी कक्षाचे हे दुसरे वर्ष असून पालखी सोहळ्यात सहभागी असलेले वारकरी लहान मुले (एक वर्षाच्या आतील) वारकरी सांप्रदायातील लहान मुले असणार्या मातांना बाळाला स्तनपान करण्यासाठी कक्षाची स्थापना केली गेली आहे.
यामध्ये बालकासाठी खेळणी, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था ओआरएस पाकिटे, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन आदींची साहित्य याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौंडज व वाल्हे येथील पालखी तळ या ठिकाणी हे दोन कक्ष तयार केले आहेत.
वाल्हे ग्रामपंचायत, व दौंडज ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुरंदर यांच्या समन्वयाने हा हिरकणी कक्ष चालू केला आहेत.
यावेळी, सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच अमित पवार, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे, वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे, डॉ. धैर्यशील मिसाळ व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका अनिता भुजबळ,
अंगणवाडी सेविका, मदतनीस प्राथमिक शिक्षका आदींनी यासाठी सहकार्य केले असल्याची माहिती वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे यांनी दिली.




