लोहगावात सापडले दोन करोनाबाधित

डॉक्टर आणि किराणा दुकानदारांचा समावेश
पुणे / विश्रांतवाडी – लोहगावमध्ये दोन करोनाबाधित रुग्ण आढळले असून यामध्ये डॉक्टर आणि किराणा दुकानदाराचा समावेश आहे. संबंधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.
लोहगावात ज्या दोन रुग्णांना करोना झाला आहे. त्यामध्ये एक डॉक्टर आणि एका किराणा माल दुकानदाराचा समावेश आहे. संबंधित डॉक्टराचा दवाखाना लोहगावातील मध्यवस्तीमध्ये आहे, त्यामुळे डॉक्टरांकडे उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांचा शोध घेतला जात आहे. त्याचबराबेर किराणा मालाच्या दुकान सुद्धा मुख्य बाजारपेठेत आहे. या दुकानदाराकडे येणाऱ्या ग्राहकांचीही आता तपासणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य निरिक्षका ललिता तमनर यांनी सांगितले.
नागरिकांच्या बेफिकीरीपणामुळेच दोन रूग्ण आढळले आहेत. आता ही संख्या पुन्हा वाढणार अशीच भिती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे आता करोनापासून बचाव करायचा असेल तर आपल्याला घराबाहेर पडताना काळजी ही घ्यावीच लागणार आहे.





