पुणे जिल्हा | जुन्नरमधून दोन मुले बेपत्ता
Updated On:

जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नरमधील दोन अल्पवयीन मुले राहत्या घरातून खेळायला जातो असे सांगून गेलेले असतानाही दोन दिवसानंतरही ते घरी परत आले नसल्याने दोघेही हरवले असल्याची तक्रार जुन्नर पोलीस ठाण्यात नोंद केलेली आहे.
यश निलेश काळे (वय 12), करण संदीप माळी (वय 13 दोघे रा. जुन्नर) असे बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत.बेपत्ता यश हा रंगाने गोरा, चेहरा गोल, सडपातळ बांधा, अंगावर निळा शर्ट, निळी पॅन्ट, पायात चप्पल,
मराठी बोलतो तर करण हा रंगाने सावळा, सड पातळ बांधा, चेहरा गोल, अंगावर पांढरा शर्ट,काळी पॅन्ट, मराठीत बोलतो अशा वर्णनाची ही दोन लहान मुले कोणास दिसून आल्यास त्यांनी जुन्नर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.





