दापोलीमध्ये दोन बसेसचा समोरासमोर भीषण अपघात; २५ प्रवासी गंभीर जखमी
Updated On:

मुंबई : रत्नागिरीच्या दापोलीमध्ये दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसचा चालक गंभीर जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमींमध्ये महिला आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.





