नवी दिल्ली :– मोदी सरकारने पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन सर्वपक्षीय बैठका बोलावल्या आहेत. जी-20 कार्यक्रमांसाठीची तयारी आणि संसद अधिवेशनातील कामकाज याविषयीची माहिती देण्यासाठी त्या बैठका होणार आहेत.
जगातील महत्वाच्या 20 विकसित आणि विकसनशील देशांचा समावेश असणाऱ्या गटाचे (जी-20) अध्यक्षपद 1 डिसेंबरला भारत औपचारिकरित्या स्वीकारेल. त्यानंतर 5 डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक होईल. त्या बैठकीत पुढील वर्षभर चालणारे कार्यक्रम, बैठका आणि त्यांच्या तयारीचे सादरीकरण केले जाईल.
त्यानंतर पुढच्याच दिवशी म्हणजे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला दुसरी सर्वपक्षीय बैठक होईल. अधिवेशनात होणारे कामकाज, उपस्थित केले जाणारे मुद्दे याविषयी त्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा
संसद अधिवेशनासाठी 7 ते 29 डिसेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. ते अधिवेशन सुरळितपणे चालावे असा सरकारचा प्रयत्न असेल. त्यासाठी सर्व पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन सरकारकडून बैठकीत केले जाईल.