शिरुर: शिरुर पोलीस स्टेशनमध्ये दि. १ मार्च रोजी घरासमोरून ट्रक्टर चोरुन नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी निलेश प्रकाश कोरेकर ( वय ४० वर्षे ) रा. न्हावरे ता. शिरूर यांनी त्यांच्या घरासमोरील ट्रॅक्टर व काकरी पाळी यंत्र कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेलीस असल्याची फिर्याद शिरूर पोलीस स्टेशनला दिली होती. या गुन्ह्याच्या तपासकरिता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याचे ठरवले. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या अभावामुळे चोरट्याचा माग काढण्यात पोलिसांना अडचण निर्माण होती. अखेर पोलिसांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवत दौंड येथून सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या.
फिर्यादी निलेश प्रकाश कोरेकर यांच्या घरासमोरील ट्रॅक्टर आणि काकळी पाळीचे यंत्र १ मार्च रोजी चोरून नेण्यात आल्याची घटना घडली होती. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर रित्या सुरू करण्यात आला होता, तपासा दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. चोरटयांनी ट्रॅक्टर चोरी करून न्हावरा रोडने करडे, रांजणगाव, निमगाव म्हाळुंगी मार्गे पुन्हा न्हावरा-शिक्रापूर रोडला ट्रॅक्टर आल्याचे आढळून आले. पुढे सीसीटीव्हीचा अभाव असल्याने ट्रॅक्टरचा माग काढण्यास पथकाला अडचणी येवू लागल्या. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाचा आधार व गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळवण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला दौंडमधून सापळा रचून ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपी नामे समीर बापू कुंजीर (वय २१ वर्ष ), निखील दत्तात्रय ठाकर (वय २२ वर्षे ) दोघे रा. टाकळी भिमा, ता. दौंड जि पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बाबुराव नगर, शिरूर येथून ट्रॅक्टर सह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्हयात चोरी गेलेला न्यू हॉलंड कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व काकरी पाळीचे यंत्र असा एकूण २,००,०००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईत हस्तगत केला आहे.
आरोपींना ट्रॅक्टर व काकरी पाळी यंत्रासह शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असून त्यांना न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीण, सागर धुमाळ यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे.