Twinkle Khanna: रंगावरून होणाऱ्या मुलांच्या तुलनेवर ट्विंकल खन्नाने केले भाष्य, अभिनेत्री म्हणाली…

Twinkle Khanna on kids Nitara and Aarav’s different skin tones : ट्विकंल खन्ना बॉलिवडूमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती चित्रपटांमध्ये फारशी काम करत नसली तरी आपल्या मतांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच एका मुलाखतीत मुलांना रंगभेदावरून बोलणाऱ्यांना ट्विकंल खन्नाने सडेतोड उत्तर दिले आहे.
अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि अभिनेता अक्षय कुमार यांना आरव आणि नितारा अशी दोन मुलं आहेत. आरव सध्या परदेशात शिक्षण घेत आहे, तर नितारा शाळेत आहे. त्यांची दोन्ही मुलं सोशल मीडियापासून दूरच असल्याचे दिसून येते. मात्र, अनेकदा दोन्ही मुलांची रंगावरून तुलना केली जात असल्याचे समोर आले आहे. ट्विंकलने आता यावर भाष्य केली आहे.
रंगावरून होणाऱ्या मुलांच्या तुलनेबाबत बोलताना एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली की, पहिल्या बाळाकडून मी खूप काही शिकले आहे. पहिल्या बाळासोबत तुम्ही काही प्रयोगही करत असता. दुसऱ्या बाळाच्या वेळी मला जाणवले की, ती सर्वसाधारण भारतीय मुलींप्रमाणे दिसते. तिची व तिच्या भावाची रंगावरून नेहमीच तुलना होते. अशा गोष्टी आपल्या देशात होत असतात.
ट्विंकल पुढे म्हणाली की, ‘मी सुनिश्चित केले की ती सर्वोत्तम आहे, असा विश्वास तिला वाटेल. मी तिला सांगितले की, तू फ्रीडा काहलोप्रमाणेसुंदर आहे. ती जेवढी अमेजिंग होती, तेवढीच तू सुद्धा आहे. ती जर सावळी आहे, तर मी तिला सांगेल की तिच्या त्वचेचा रंग गोल्डन आहे.’
यावेळी बोलताना तिने आपल्या दोन्ही मुलांचा एक किस्सा देखील सांगितला. अभिनेत्रीने सांगितले की, नितारा एकदा तिच्या भावासोबत समुद्र किनाऱ्यावर बसली होती आणि आरव तिला सुर्यप्रकाशापासून वाचवत होता. त्यावर ती म्हणाली की, मला याची गरज नाही. माझी त्वचा तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहे. पांढरे टी-शर्ट खराब होऊ शकते, पण ब्राउन रंगाचे टीशर्ट होत नाही.’





