Posted by Amitabh Bachchan : बॉलिवूड इंडस्ट्रीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ११ ऑक्टोबर रोजी त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा केला. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंच्या फिल्मी कारकीर्दीत कित्येक सिनेमांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. बिग बी सोशल मीडियावर देखील सक्रीय असून ते नेहमी अशा काही पोस्ट शेअर करतात की चाहते संभ्रमात पडतात. त्यांच्या अनेक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. नुकतेच वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी एक्सवरून ट्वीट शेअर केले आहेत. त्यांनी १० ऑक्टोबर बोलायला शिकण्यासाठी दोन वर्षे लागली आणि गप्प राहायला शिकण्यासाठी ८० वर्षे लागली, असे ट्वीट केले. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी अमिताभ यांनी ‘दिवस वेगाने जात आहे’ – ‘मी शिकत आहे, शिकलेले ज्ञान विसरण्यासाठी.’ असे ट्वीट केले. या दोन ट्वीटमधून बिग बींनी त्यांच्या कामाबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले आहे. वाढदिवसच्या निमित्ताने बिग बींच्या घरी मोठ्या प्रमाणार सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. सध्या अमिताभ बच्चन त्यांच्या लोकप्रिय “कौन बनेगा करोडपती” हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. केबीसीच्या सेटवरही अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यात आला. अमिताभ बच्चन शेवटचे रजनीकांत यांच्यासोबत “वेट्टाय्यान” या सिनमात दिसले होते. आगामी “कलकी २८९८ एडी” च्या सिक्वेलमध्ये ते दिसणार आहेत. त्यामुळे आता चाहते त्यांच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. हेही वाचा : “अजूनही ते खोटे बोलतायत…” ; ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला चूक म्हणणाऱ्या चिदंबरमवर SGPC चे प्रत्युत्तर