EV Market: ई-टूव्हीलर बाजारात TVS Motorचे वर्चस्व कायम; मार्चमध्ये 38 हजार नोंदणी, Ola Electric 5व्या क्रमांकावर
EV Market: केंद्र सरकारच्या PM E-DRIVE योजनेची मुदत 31 मार्च 2026 रोजी संपत असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांवर तात्काळ प्रोत्साहन दिले जाते. सबसिडी संपण्यापूर्वी कमी किमतीत वाहन घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याने मार्चमध्ये विक्रीत मोठी वाढ झाली.

EV Market: भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात TVS Motor कंपनीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. सरकारच्या ‘वाहन’ पोर्टलवरील आकडेवारीनुसार, मार्च 2026 मध्ये देशभरात एकूण 1,39,238 इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची नोंदणी झाली. त्यापैकी 38,007 युनिट्स TVS Motorच्या असून कंपनीचा बाजारातील हिस्सा 27.3 टक्क्यांवर पोहोचला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर Bajaj Auto असून कंपनीने 33,447 युनिट्सची नोंदणी केली आहे. तिचा बाजारातील हिस्सा 24 टक्के आहे. Bajajच्या Chetak इलेक्ट्रिक स्कूटरला मिळणाऱ्या मागणीमुळे कंपनीला हे यश मिळाले आहे.
तिसऱ्या क्रमांकावर Ather Energy आहे. कंपनीने 26,151 युनिट्सची विक्री करत 18.8 टक्के बाजारहिस्सा मिळवला. Atherच्या 450 सिरीज आणि Rizta या स्कूटर मॉडेल्सची स्थिर मागणी यामागे कारणीभूत ठरली आहे. EV Market
Hero MotoCorpच्या इलेक्ट्रिक ब्रँड Vida ने 15,683 नोंदणीसह 11.3 टक्के बाजारहिस्सा मिळवत चौथा क्रमांक पटकावला. मात्र, Ola Electricला घसरणीचा सामना करावा लागला असून कंपनी 6,381 युनिट्स विक्री आणि 4.6 टक्के बाजारहिस्स्यासह पाचव्या स्थानावर घसरली आहे.
इतर कंपन्यांमध्ये Ampereने 5,378 युनिट्स (3.9%), Riverने 3,135 युनिट्स (2.3%), BGaussने 2,296 युनिट्स (1.6%) आणि Pure EVने 259 युनिट्स (0.2%) नोंदवले. तसेच इतर छोट्या कंपन्यांनी मिळून 8,501 युनिट्स (6.1%) इतका वाटा उचलला. यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये एकूण नोंदणी 1,01,059 युनिट्स होती.
iQube स्कूटरमुळे TVSला बळ – EV Market
TVSच्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरला मिळणारी सातत्यपूर्ण मागणी ही कंपनीच्या यशामागील प्रमुख कारण ठरली आहे. वितरण जाळ्याचा विस्तार आणि सोपी वित्तीय सुविधा उपलब्ध झाल्याने iQube आता मोठ्या शहरांबरोबरच लहान शहरांमध्येही पोहोचला आहे.
मार्चमध्ये ऑफर्समुळे विक्रीत वाढ – EV Market
आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपन्यांनी स्टॉक कमी करण्यासाठी विविध सवलती आणि ऑफर्स जाहीर केल्या. त्यामुळे मार्च महिन्यात विक्रीत मोठी वाढ झाली. Ola Electricने “End ICE Age” मोहीम राबवत Gen 3 S1 X (2kWh) आणि Roadster X (2.5kWh) मॉडेल्सची सुरुवातीची किंमत 49,999 रुपये ठेवली. तसेच कंपनीने 50,000 रुपयांपर्यंतचे फायदे जाहीर केले. ही ऑफर 31 मार्च 2026 पर्यंत मर्यादित होती.
Ather Energyनेही Rizta आणि 450 सिरीज स्कूटर्सवर 20,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले. यात 10,000 रुपये क्रेडिट कार्ड सवलत, 6,500 रुपये कॅश डिस्काउंट आणि 3,500 रुपयांची अतिरिक्त वॉरंटीचा समावेश होता.
PM E-DRIVE सबसिडीमुळे मागणीत उसळी – EV Market
केंद्र सरकारच्या PM E-DRIVE योजनेची मुदत 31 मार्च 2026 रोजी संपत असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांवर तात्काळ प्रोत्साहन दिले जाते. सबसिडी संपण्यापूर्वी कमी किमतीत वाहन घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याने मार्चमध्ये विक्रीत मोठी वाढ झाली.





