नगर | अनाथ मुलांच्या वसतिगृहाला टीव्ही भेट
Updated On:

शेवगाव, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील शेवगाव तालुका शिवसेनेच्यावतीने उचल फाउंडेशन संचलित अनाथ मुलांच्या वसतिगृहात ऑनलाईन शिक्षणासाठी मदत व्हावी, त्यांना जगाच्या चालू घडामोडी कळाव्यात म्हणून ४३ इंची एलईडी टीव्ही भेट देण्यात आला.
यावेळी शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट, तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे, विशाल परदेशी, संदीप लांडगे, शुभम कबाडी, ऋषिकेश बाहेती, प्रसाद डाके व उचल फाऊंडेशनच्या डॉ. मनीषा लड्डा, मिनाक्षी शिंदे, वसुधा सावरकर, सचिन खेडेकर आदी उपस्थित होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उचल फाऊंडेशनचे कामकाज आस्थेने जाणून घेतले . खेडेकर यांनी सर्वाचे आभार मानले.





