तुषार कपूरचे फेसबुक अकाउंट हॅक; स्वत: दिली चाहत्यांना माहिती

Tusshar Kapoor| बॉलीवूड अभिनेता तुषार कपूरचे सार्वजनिक आणि खासगी फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे तो फेसबुकवर काही काळापासून सक्रिय नव्हता.
तुषार कपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “हॅलो, मी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो. माझे सार्वजनिक आणि खासगी फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. त्यामुळेच मी सध्या या प्लॅटफॉर्मवर निष्क्रिय आहे. माझी टीम आणि मी मिळून हे अकाउंट पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच ते पुन्हा सक्रिय होईल. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.”
View this post on Instagram
तुषार कपूरने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याची पोस्ट पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. दरम्यान, तुषार कपूर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल’ चित्रपटात दिसला होता.या सिनेमातील त्याची ‘लकी’ची भूमिका विशेष गाजली. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अलीकडेच तुषारने ‘दस जून की रात’ या वेब सीरिजद्वारे ओटीटी डेब्यू केला.





