वाघोली गावातील स्ट्रीट लाईट त्वरित चालू करा – संदीप सातव

वाघोली (प्रतिनिधी) : नगर रोड क्षेत्रीय कार्यालय मधील सहाय्यक आयुक्त सुहास जगताप साहेब यांना भेटून वाघोली गावातील स्ट्रीट लाईट त्वरित चालू करण्याबाबत भाजप नेते संदीप सातव यांनी निवेदन दिले .
याबाबत संदीप सातव यांनी सांगितले की, वाघोली मधील स्ट्रीट लाईट अनेक दिवस झाले बंद आहे. अनेक वेळा पाठपुरावा केला असता अशी माहिती सांगण्यात आली आहे की स्ट्रीट लाईट चे बील भरले नाही म्हणून विद्युत पुरवठा बंद केला आहे. स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे रात्री अपरात्री महिलांना, वृद्ध व्यक्ती ,मुलांना बाहेर पडणे मुश्किल व धोकादायक झाले आहे तसेच अंतर्गत रोड वर स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात झाले आहे. याची जबाबदारी कोणाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाघोली गावाचे क्षेत्रफळ खूप मोठे असल्यामुळे ग्रामपंचायत माध्यमातून अनेक भागांमध्ये वाड्या-वस्त्यांवर ती स्ट्रीटलाइट बसवण्यात आली होती. परंतु अनेक स्ट्रीट लाईट बंद आहे. हे दुरुस्त केले जात नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. बंद असलेल्या स्ट्रीट लाईट त्वरित दुरुस्त करून चालू करण्यात याव्यात अन्यथा 01/02/2022 रोजी सकाळी 11 वा. महानगर पालिकेचे वाघोली येथील कार्यालयाला टाळे लावणार आहोत, असा इशारा सातव यांनी दिला आहे.





