“छान दिसताय तुम्ही, पण धूम्रपान सोडा…” ; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा जॉर्जिया मेलोनींना सल्ला

Turkish President On Meloni। इजिप्तमधील शर्म अल-शेख रिसॉर्ट याठिकाणी गाझा युद्ध संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आयोजित करण्यात आली होती. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान, जर्मन चांसलर, कतारचे अमीर, इजिप्तचे अध्यक्ष, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ब्रिटन, फ्रान्स आणि जॉर्डनचे प्रमुख उपस्थित होते. परिषदेचा मुख्य उद्देश गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवणे आणि या प्रदेशात कायमस्वरूपी शांततेचा मार्ग शोधणे हा होता.
एर्दोगान यांनी जॉर्जिया मेलोनी यांना हा प्रश्न विचारला Turkish President On Meloni।
परिषदेदरम्यान, एर्दोगान सक्रिय आणि मैत्रीपूर्ण दिसले. त्यांनी अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि वातावरण हलके ठेवले. त्यांनी विनोदाने इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना सांगितले की, “त्या छान दिसतात फक्त त्यांनी धूम्रपान सोडावे”असा सल्ला दिला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन देखील जवळ होते आणि त्यांचे हास्य ऐकू येत होते.
मेलोनी हसले आणि उत्तर दिले की “मला माहिती आहे, मला कोणाला मारायचं नाही” एर्दोगान यांनी यावेळी असेही म्हटले की,” तुर्की “धूम्रपानमुक्त भविष्यासाठी” काम करत आहे आणि ते जिथे जातील तिथे लोकांना धूम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करतात.
परिषदेत सर्वात चर्चेचा विषय होता इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची अनुपस्थिती. त्यांच्या कार्यालयाने आधीच स्पष्ट केले होते की ते उपस्थित राहणार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, एर्दोगान आणि इतर काही नेत्यांनी त्यांच्या संभाव्य सहभागावर आक्षेप व्यक्त केला.
“…I have to make you quit smoking..”, Turkiye Prez Erdogan tells Italian PM Meloni. Spoke as leaders gather for the Summit for peace in Egypt on Gaza. pic.twitter.com/AxVJvdqx8r
— AsiaWarZone (@AsiaWarZone) October 13, 2025
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले? Turkish President On Meloni।
संयुक्त बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी ऑनलाइन संदेश पाठवून सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि मानवतावादी मदत वाढवण्याचे आवाहन केले.
मध्य पूर्व संकटाच्या काळात शर्म अल-शेख परिषद एक महत्त्वाचे राजनैतिक व्यासपीठ ठरली, जिथे सर्व देशांनी पुनरुच्चार केला की गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता तेव्हाच शक्य आहे जेव्हा सर्व पक्ष हिंसाचार सोडून संवादाचा अवलंब करतील.





