सीरियावरील हवाई हल्ल्यात तुर्कीचे 29 सैनिक ठार
Updated On:

अंकारा – सीरियातील इडलिब प्रांतात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात तुर्कीचे 29 जवान ठार झाल्याचे वृत्त आहे. तुर्कीच्या सरकारने ही माहिती दिली आहे. त्यांनी या हल्ल्याबद्दल तेथील सरकारवरच ठपका ठेवला आहे.
या हल्ल्यात अन्य 36 तुर्की जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील अनेक सैनिकांची प्रकृती गंभीर असून त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सीरियातील इडलिब या प्रांतात सीरियन सरकार आणि रशियाच्या लष्कराकडून हवाई हल्ले केले जात आहेत. तेथील बंडखोरांचा खात्मा करण्याचा प्रयत्न सीरियन सरकारकडून केला जात असून त्याला तुर्की व अमेरिका या देशांचा विरोध आहे. त्यामुळे सध्या तेथे अमेरिका व त्यांची दोस्त राष्ट्रे आणि सरिया-रशिया या आघाडी मध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातूनच हे हल्ले करण्यात आल्याचे मानले जात आहे.





