पुणे जिल्हा | पेठ येथील रस्त्यासाठी उपोषण करणार – तुळशीराम चौधरी

सोरतापवाडी, (प्रतिनिधी) – पेठ (ता. हवेली) येथील ग्रामीण मार्ग 265 चारवाडा ते प्रयागधाम रस्ता डांबरीकरण करणे अथवा निधी मंजूर झाला नाही तर एक महिन्यानंतर उपोषणाला बसणार असल्याचे पेठेतील माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम चौधरी यांनी सांगितले.
ग्रामपंचायत पेठगावच्या विकासासाठी ग्रामीण मार्ग 265 चारवाडा ते प्रयागधामपर्यंतचा रस्ता दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असून हा मुख्य रस्ता असून हा रस्ता कच्चा असल्याने दळणवळण करण्यास अडथळे निर्माण होत आहे.
पावसाळ्यात तर या रस्त्यावरुन चालायला सुद्धा येत नाही. हा रस्ता डांबरीकरण झाल्यास खूप मोठी समस्या व शेतकर्यांची रस्त्यासाठी असलेली अडचण दुर होईल. वेळोवेळी शासन दरबारी ग्रामपंचायत मार्फत सर्व स्थरावर पाठपुरावा केला असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,
पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामविकास मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा केला असून शेतकर्यांच्या या प्रश्नाकडे शासनाकडे वेळ नसल्यामुळे एक महिन्यानंतर उपोषण करणार असल्याचे तुळशीराम चौधरी यांनी सांगितले.





