रोजगार वाचविण्यासाठी प्रयत्न करा; फ्युचर समुहातील महिलांचे पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली – फ्युचर समूहाची बिग बजार आणि इतर आणिक स्टोअर देशातील मोठ्या शहरात कार्यरत आहेत यामध्ये महिला बऱ्याच संख्येने काम करीत आहेत. मात्र फ्युचर समूह आणि मेझॉन कंपनी दरम्यान बरेच कायदेशीर मतभेद झाले आहेत.
त्याचा परिणाम आमच्या रोजगारावर होऊ शकतो. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे फ्युचर समूहातील महिला कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
तशा आशयाचे पत्र या कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. फ्युचर समूहाने आपली बहुतांश स्टोअर रिलायन्स उद्योग समूहाला विकले आहेत. रिलायन्स उद्योग समूहाने ही स्टोअर चालविण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर फ्युचर समूहाची जुने देणे देण्याचे आश्वासन दिले आहे.
मात्र या व्यवहाराला अमेझॉन कंपनीने हरकत घेतली आहे. यासंदर्भात देशातील आणि परदेशातील न्यायालयात दावे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने पुढाकार घ्यावा असे या महिलांनी पत्रात म्हटले आहे.
फ्युचर समूहाच्या देशभरातील कामकाजावर लॉकडाउनच्या काळामध्ये परिणाम झाला होता. अजूनही परिस्थिती सुधारलेली नाही. मात्र रिलायन्स बरोबर झालेल्या व्यवहारामुळे आशेचा किरण दिसून आला होता. मात्र आता हे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे संदिग्धता निर्माण झाली आहे.
तुझ्यावर समूहामध्ये 2.1 लाख रोजगार आहेत. त्यातील दहा हजार रोजगार प्रत्यक्ष तर दोन लाख रोजगार अप्रत्यक्षरीत्या निर्माण झालेल्या आहेत. गेल्या आठवड्यात फ्यूचर समूहाला पुरवठा करणाऱ्या संस्थांनीही ऍमेझॉन कंपनीने या व्यवहारात कायदेशीर अडथळे निर्माण करू नये असे आवाहन केले आहे.





