तृप्ती डिमरीला मिळाली मोठी ऑफर; आता ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत चित्रपटात झळकणार

Tripti Dimri | अभिनेत्री तृप्ती डिमरीला ‘ॲनिमल’ चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर तिला अनेक चित्रपटांसाठी ऑफर आली. यातच आता तिला मोठी लॉटरी लागली आहे. विशाल भारद्वाजच्या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात तृप्ती डिमरी झळकणार आहे. यात ती अभिनेता शाहिद कपूरसोबत पाहायला मिळणार आहे.
साजिद नाडियाडवालाच्या ग्रँडसन एंटरटेनमेंटने शुक्रवारी हीघोषणा केली आहे. त्यानुसार आता आगामी चित्रपटासाठी अभिनेता शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांना कास्ट केले आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर शाहिद, तृप्ती, विशाल आणि साजिद नाडियादवाला यांच्या छायाचित्रांचा कोलाज देखील शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर तृप्तीनेही कमेंट केली आहे. तिने कमेंट सेक्शनमध्ये एक स्माइली इमोजी पोस्ट केली.
View this post on Instagram
दरम्यान, शाहिद शेवटचा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’मध्ये दिसला होता. आगामी ॲक्शन थ्रिलर ‘देवा’मध्ये तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि पावेल गुलाटी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज होणार आहे.
तृप्तीला संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या ॲक्शन चित्रपटातील झोयाच्या भूमिकेतून मोठी ओळख मिळाली. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. तृप्ती शेवटची ‘बॅड न्यूज’मध्ये विकी कौशल आणि एमी विर्कसोबत दिसली होती. यानंतर आता ती शाहिद कपूरसोबत काम करताना दिसणार आहे.
हेही वाचा:





