ट्रम्प पूर्णपणे तंदुरुस्त, व्हाईट हाऊसच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम; डॉक्टरांचा अहवाल आला समोर

वेस्ट पाम बीच – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुर्णपणे तंदुरुस्त असल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर स्पष्ट केले आहे. ट्रम्प हे अध्यक्षपदी निवड झालेले आतापर्यंतचे सर्वात ज्येष्ठ वयाचे नेते आहेत. व्हाईट हाऊसचे कमांडर इन चीफ म्हणून काम करण्यास ट्रम्प पुर्णपणे सक्षम असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
ट्रम्प ७८ वर्षांचे आहेत. १४ जूनला ते ७९ वर्षांचे होणार आहेत. ट्रम्प यांच्या सक्रिय जीवनशैलीमुळेच ते पुर्ण तंदुरुस्त असल्याचे त्यांचे डॉक्टर, नेव्ही कॅप्टन शॉन बार्बेबेला यांनी सांगितले.
ट्रम्प हे कमांडर-इन-चीफ आणि राज्यप्रमुखांच्या कर्तव्यांना पार पाडण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. २०२० मध्ये अध्यक्ष म्हणून शेवटच्या शारीरिक तपासणीनंतर ट्रम्प यांचे वजन २० पौंड कमी झाले आहे. त्यावेळी त्याचे वजन २४४ पौंड होते आणि आता ते २२४ पौंड झाले आहे.
ट्रम्प यांची यापूर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली होती.ट्रम्प यांच्या कोलेस्टेरॉलची पातळी कालांतराने सुधारली आहे, त्यासाठी काही औषधांनी मदत केली आहे.त्यांच्या हृदयाचे ठोके देखील नियमित आहेत, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.





