ट्रम्प यांच्या आगीशी खेळण्याच्या विधानावर रशिया संतापला ; दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी

Trump vs Putin । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या प्रचंड संतापले असल्याचे दिसत आहेत. याचे कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आहेत. ट्रम्प यांना कोणत्याही किंमतीत रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धबंदी हवी आहे. पण पुतिन यासाठी तयार नाहीत. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी पुतिन यांना स्पष्टपणे सांगितले होते की आमचे ऐकत नाही, ते आगीशी खेळत आहेत, परंतु आता रशियाने ट्रम्पच्या या धमकीला योग्य उत्तर दिले आहे.
रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी, “ट्रम्प यांनी पुतिन यांच्याबद्दल असे म्हटले होते की ते आगीशी खेळत आहेत आणि ते रशियाचे काहीतरी वाईट करू शकतात. मला फक्त एकच वाईट गोष्ट माहित आहे आणि ती म्हणजे तिसरे महायुद्ध. ट्रम्प यांना हे समजेल अशी आशा आहे.” असे म्हटले आहे. Trump vs Putin ।
अमेरिका आणि रशियाच्या या विधानांवरून हे स्पष्ट होते की दोन्ही देशांमध्ये सर्व काही सामान्य नाही. यापूर्वी ट्रम्प यांनी पुतिनवर टीका केली होती आणि म्हटले होते की व्लादिमीर पुतिन यांनी हे समजून घ्यावे की जर मी तिथे नसतो तर आतापर्यंत रशियासोबत खूप वाईट गोष्टी घडल्या असत्या आणि मी म्हणेन ते आगीशी खेळत आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी पुतिन यांना वेडेदेखील म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, “मी पुतिन यांना खूप काळापासून ओळखतो, आमचे संबंध चांगले आहेत. पण आता ते रॉकेट डागत आहेत, शहरांवर हल्ले करत आहेत, लोकांना मारत आहेत. मला हे अजिबात आवडत नाही. या माणसाला काय झाले आहे हे मला माहित नाही. आपण बोलत आहोत आणि तो कीव आणि इतर शहरांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत आहे. काहीतरी चूक आहे. मला हे सगळं अजिबात आवडत नाही. Trump vs Putin ।
ट्रम्प म्हणाले होते की,” माझे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी नेहमीच खूप चांगले संबंध राहिले आहेत, पण त्यांच्यासोबत काहीतरी घडले आहे. ते (पुतिन) पूर्णपणे वेडे झाले आहेत. ते विनाकारण अनेक लोकांना मारत आहेत आणि मी फक्त सैनिकांबद्दल बोलत नाहीये. युक्रेनियन शहरांवर विनाकारण क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले जात आहेत. मी नेहमीच म्हटले आहे की त्यांना संपूर्ण युक्रेन हवे आहे, फक्त युक्रेनचा एक तुकडा नाही, आणि ते खरे ठरू शकते, परंतु जर त्यांनी तसे केले तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरेल.”





