आता इंडोनेशियावर ट्रम्पचा ‘टॅरिफ बॉम्ब’ फुटला ; आयातीवर लादला १९% कर

Trump Tariff । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडोनेशियावर आपली वक्रदृष्टी टाकली आहे आहे. कारण काल त्यांनी इंडोनेशियावर १९ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ आता इंडोनेशियाहून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवर १९ टक्के कर आकारला जाण्यात येणार आहे. तर अमेरिकेतून इंडोनेशियाला होणाऱ्या निर्यातीवर कोणताही कर लागणार नाही.
इंडोनेशिया अमेरिकेतून या गोष्टी खरेदी करेल Trump Tariff ।
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ही घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी अमेरिकन आयातीवरील व्यापारी अडथळे दूर करण्याबाबत फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी असेही मान्य केले की त्यांचा देश पुरेशा प्रमाणात अमेरिकन उत्पादने खरेदी करेल याविषयीची माहित दिली.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये, ‘या कराराअंतर्गत, इंडोनेशियाने १५ अब्ज डॉलर्सची ऊर्जा, ४.५ अब्ज डॉलर्सची कृषी उत्पादने आणि ५० बोईंग जेट अमेरिकेकडून खरेदी करण्याचे वचन दिले आहे’.असे म्हटले. तसेच त्यांनी पुढे म्हटले की, “अमेरिकन शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांना आता २८० दशलक्ष लोकांच्या इंडोनेशियाच्या ग्राहक बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळेल.”
अमेरिकेला भारताला पूर्ण प्रवेश मिळेल
यासह, ट्रम्प यांनी असेही संकेत दिले की भारतासोबतचा व्यापार करार अंतिम टप्प्यात येण्याच्या जवळ आहे. त्यांनी सांगितले की अमेरिका भारतालाही पूर्ण व्यापार प्रवेश मिळवण्याच्या जवळ आहे. ट्रम्प म्हणतात, “आम्हाला भारतातही प्रवेश मिळणार आहे. आणि तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की आम्हाला यापैकी कोणत्याही देशात प्रवेश नव्हता. आमचे लोक तिथे जाऊ शकत नव्हते. आता आम्हाला टॅरिफमुळे प्रवेश मिळत आहे.”
ट्रम्प ब्रिक्स देशांवर संतापले आहेत Trump Tariff ।
डोनाल्ड ट्रम्प सध्या ब्रिक्स देशांना लक्ष्य करत आहेत. ब्रिक्स गटात ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. अलीकडेच ६ आणि ७ जुलै रोजी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे ब्रिक्स देशांची बैठक झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाग घेतला. बैठकीत ब्रिक्स चलनाबद्दल चर्चा झाली.
ब्रिक्स देशांना अमेरिकन डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करून एक सामान्य चलन तयार करायचे आहे, ज्यामुळे त्यांना व्यापार करणे सोपे होईल आणि जोपर्यंत ब्रिक्स चलनावर सहमती होत नाही तोपर्यंत व्यापार केवळ परस्पर चलनातच केला पाहिजे. ट्रम्प यामुळे चिडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा ब्रिक्स देशांनी डॉलरला आव्हान देत ब्रिक्स चलनाची घोषणा केली होती, तेव्हाही ट्रम्पने या देशांना धमकी दिली होती. पण १०० टक्के टॅरिफ लादण्याची चर्चा होती.





