डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; बायडेन, हॅरिस यांची सुरक्षा काढली

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पूर्वीच्या बायडेन प्रशासनातील उपाध्यक्षा आणि निवडणुकीत पराभव झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी, कमला हॅरिस आणि हिलरी क्लिंटन, तसेच इतर अनेक माजी अधिकारी आणि टीकाकारांचे सुरक्षा परवाने रद्द केले आहेत. त्यांच्यापुर्वीचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची सुरक्षा देखील रद्द करत आहेत, असे ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितले होते. बायडेन कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याची सुरक्षा देखील रद्द करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष किंवा माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सौजन्य म्हणून सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येत असते. मा६ यापुढे ही सुरक्षा देणे राष्ट्रीय हिताचे नाही. त्यामुळे यापुढे माजी अध्यक्षांना ही सुरक्षा न देण्याचा निर्णय आपण घेतल्याचे ट्रम्पयांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी विभाग आणि एजन्सी नेत्यांना या व्यक्तींसाठी सुरक्षा सुविधा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.





