“प्रश्न मार्गी लागतील तेंव्हाच चर्चा” ; ५० % टॅरिफनंतरही ट्रम्पची भारताविषयी दंडेलशाही सुरूच

Trump on India tariffs। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के करबाबत आणखी एक मोठे विधान केले आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी “हा प्रश्न सुटेपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा पुढे जाणार नाही.” असे स्प्ष्टपणे सांगितले आहे.
एका वृत्तसंस्थेने डोनाल्ड ट्रम्प यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले आहे. याविषयी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी,”तुम्ही भारतावर लादलेल्या ५० टक्के करमुळे व्यापार वाटाघाटींना वेग येईल अशी अपेक्षा आहे का? यावर थोडक्यात उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, ‘नाही, आम्ही हा प्रश्न जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत कोणतेही चर्चा नाही.’ असे म्हटले आहे. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये शुल्कावरून तणाव दिसून येत आहे. अमेरिकेने ५०% कर एकतर्फी लादल्याबद्दल भारत चिंतेत आहे आणि या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक चर्चा सुरू आहेत.
अमेरिका परराष्ट्र विभागाचे विधान Trump on India tariffs।
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावेळी “… भारताचा प्रश्न आहे, तर मी असे म्हणू शकतो की राष्ट्रपतींनी व्यापार असंतुलन आणि रशियन तेल खरेदीबद्दलच्या चिंतेवर अगदी स्पष्ट भूमिका घेतली आहे. तुम्ही पाहिले असेल की त्यांनी यावर थेट पावले उचलली आहेत… भारत हा एक धोरणात्मक भागीदार आहे ज्याच्याशी आमची पूर्ण आणि स्पष्ट चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरूच राहील…” असे देखील म्हटले आहे. त्यानुसार आता असे दिसत आहे कि भविष्यात भारत आणि अमेरिकेत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतावर ५०% कर लादला Trump on India tariffs।
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील कर २५% वरून ५०% पर्यंत वाढवला आहे. तथापि, ७ ऑगस्टपासून फक्त २५% कर लागू करण्यात आला आहे, तर अतिरिक्त २५% कर २७ ऑगस्टपासून लागू होईल. यासोबतच, ट्रम्प प्रशासन आणखी एक मोठे पाऊल उचलण्याची तयारी करत आहे. ते चिप्सवर १००% कर जाहीर करणार आहेत, ज्याचा थेट परिणाम जगभरातील सेमीकंडक्टर उद्योगावर होईल. ही भारतासाठी देखील चिंतेची बाब आहे, कारण भारतीय सेमीकंडक्टर बाजारपेठ वेगाने वाढत आहे.





