Kharg Island : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या महत्त्वाच्या खर्ग आयलँडवर शक्तिशाली हवाई हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात बेटावरील सर्व इराणी लष्करी लक्ष्य पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या असून, तेलाशी संबंधित पायाभूत सुविधा मात्र मुद्दाम सुरक्षित ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, “आमची शस्त्रे जगाला माहित असलेली सर्वात शक्तिशाली आणि अत्याधुनिक आहेत. परंतु, सभ्यतेच्या कारणास्तव, मी बेटावरील तेल पायाभूत सुविधा नष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे.Kharg Island जर इराण किंवा इतर कोणीही स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गावरील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीत कोणताही अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला, तर अमेरिका आपला सध्याचा निर्णय तात्काळ बदलू शकते. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर तेल वाहतूक होते. त्यामुळे या मार्गाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.” Kharg Island Mojtaba Khamenei या समुद्री मार्गावरून जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी अमेरिका लवकरच विशेष संरक्षण व्यवस्था उभी करणार आहे. इराण किंवा इतर कोणत्याही देशाने या मार्गात हस्तक्षेप केल्यास कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. खर्ग बेट का महत्त्वाचे मानलं जातं? Kharg Island इराणच्या उत्तरेकडील पर्शियन आखातात असलेले खर्ग बेट हे देशाच्या तेल निर्यातीचे सर्वात महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या बेटातून इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी सुमारे 90 टक्के निर्यात केली जाते. हे बेट हॉर्मुझची सामुद्रधुनीपासून सुमारे 483 किलोमीटर उत्तर-पश्चिमेला असून इराणच्या मुख्य भूभागापासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर आहे. Hand Care Tips: भांडी घासून हात झाले राठ? हे सोपे घरगुती उपाय वापरा आणि हात करा पुन्हा मऊ व सुंदर खर्ग बेट (Kharg Island ) हे उत्तर पर्शियन आखातात, इराणच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्यापासून सुमारे २५-३० किमी अंतरावर आहे. ते बुशेहर बंदराजवळ आहे. खार्ग बेट इराणच्या सुमारे ९०-९५% कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी प्राथमिक टर्मिनल म्हणून काम करते. Kharg Island या बेटाचा गोड्या पाण्याचा पुरवठा आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालानुसार, या बेटावर दररोज सुमारे 70 लाख बॅरल तेल जहाजांवर लोड करण्याची क्षमता आहे. Kharg Island : हेही वाचा: Gold and Silver Rate : सलग दुसऱ्या आठवड्यात किंमती घसरल्या… पाहा सोने आणि चांदीचा आजचा भाव काय?