Success Story : ट्रक ड्रायव्हरची मुलगी बनली न्यायाधिश; सिमरनरंजितने बदलले गरीब कुटुंबाचे भविष्य

उना (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशच्या उना येथे रहात असलेल्या एका ट्रक ड्रायव्हरच्या मुलीने न्यायाधिश बनत आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बासदेहरा येथील ट्रक चालक अमरिक सिंह यांची मुलगी सिमरनजित कौर यांनी सर्व प्रकारची न्यायालयीन सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिने न्यायाधीश बनून कुटुंचे दैन्य दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सिमरनजित कौर यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील अमरिक सिंग आणि बहिणीचा मुलगा इक्बाल सिंग यांना दिले.
सिमरनजित कौर यांनी तिचे सुरुवातीचे शिक्षण डीएव्ही पब्लिक स्कूल महात्पूर येथे प्राप्त केले. यानंतर तिने पंजाब विद्यापीठातून एलएलबीचा अभ्यास केला. त्यापाठोपाठ तिने एलएलएमचाही अभ्यास पूर्ण केला. अमरिकसिंग बहुतेक वेळा चरितार्थासाठी घराबाहेर रहायचा.
परंतु या कठोर परिश्रमांना सार्थ केले ते सिमरनजीतने. तिने हे सिद्ध केले की परिस्थिती काही आणि कशीही असली तरी स्वप्नांची जाणीव झाल्यास ध्येय साध्य करता येतेच. सिमरानजीत दररोज 15 तासांपेक्षा जास्त अभ्यास करत असे. आता जेव्हा परिक्षेचा निकाल जाहीर झाला, तेव्हा कुटुंबात आनंदाची एक लहर आली.
सिमरनजित म्हणाली की, माझे ध्येय न्यायालयीन सेवेत जाणे आहे. मी पूर्ण प्रामाणिकपणाने माझे कर्तव्य बजावेन.काअज कोणतेही ध्येय साध्य केले जाऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी मी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे, यावर माझा विश्वास बसत नव्हता.
अमरिक सिंह म्हणाले की, मला माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटतो आहे. सिमरनजितने माझ्या जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव चमकावले आहे. माझी मुलगी न्यायाधीश झाल्याने आता अधिक मुला-मुलींनाही प्रेरणा मिळेल. आता सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. पण मी स्वत: यापूर्वी गाडी चालवायचो आणि आताही त्याच प्रकारे मी माझे काम सुरू ठेवणार आहे.
मुलींना अजिबात कमी लेखू नये
सिमरानजीत म्हणते की, आपण कुणीही मुलींना कमी लेखू नये. मुलींना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील फरक समजू नका आणि पुढे जाण्यात मुलींना पाठिंबा द्या. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. तेच सर्व काळ माझ्यासमवेत उभे राहिले. ट्रक चालक असूनही, वडिलांनी माझ्या अभ्यासामध्ये काहीही कमी पडू दिले नाही. या परीक्षेत हजारो मुलांनी भाग घेतला, परंतु केवळ 20 जणांनी ही परीक्षा पास केली. त्यापैकी बहुतेक जणी मुलीच आहेत.





