Trisha Krishnan: पिवळी साडी अन् केसात गजरा…, स्वातंत्र्यदिनानिमित्त त्रिशा कृष्णनचा खास, मुख्यमंत्री विजय यांचा Video व्हायरल
Trisha Krishnan : विजय थलपती यांची पत्नी संगीता यांनी कोर्टात घटस्फोटासाठी केलेला अर्ज घेतला मागे

Trisha Krishnan : तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते विजय थलपती यांनी १५ ऑगस्ट रोजी चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा केला. या सोहळ्यात थलपती विजय यांचे आई-वडील आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन देखील उपस्थित होती. यावेळी तिने खास लुक केला होता, ज्यामुळे पुन्हा एकदा तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
विजय थलपती आणि त्रिशा कृष्णन यांच्या नात्याची बऱ्याच महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. यापूर्वी त्रिशा आणि थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यालाही उपस्थित होती. हे दोघे अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसतात. आता समोर आलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
VIDEO | Chennai: TN CM Vijay arrives at Secretariat for Independence Day event.
(Full video available on PTI Videos – https://t.co/d8jp61yd2p) pic.twitter.com/CC4jmi1CwS
— Press Trust of India (@PTI_News) August 15, 2026
त्रिशा कृष्णनचा खास लुक
या व्हिडीओत त्रिशा कृष्णन, विजयचे वडील एस. ए चंद्रशेखर आणि त्यांची आई शोभा चंद्रशेखर यांच्यासोबत बसलेली दिसत आहे. या खास दिनी अभिनेत्रीने पिवळी साडी नेसली होती. तसेच हिरवा ब्लाऊज घातला होता. तिने केसात गजरा माळला होता. या सोहळ्यात त्रिशा कृष्णन प्रचंड आनंदात आणि उत्साहात दिसत आहे.
अलिकडेच विजय थलपती यांची पत्नी संगीता यांनी कोर्टात घटस्फोटासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहून त्यांनी हा खटला पुढे चालवण्याची इच्छा नसल्याचे सांगितलं होतं, यानंतर चेंगलपट्टू कोर्टाने हे प्रकरण बंद केले आहे.
दरम्यान, आता आणखी एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील त्रिशाच्या सॅल्यूट आणि तिच्या उपस्थितीनं पुन्हा एकदा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा:





