South Movie : त्रिशा कृष्णन सापडली अडचणीत

South Movie : पोन्नियिन सेल्वन अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि मन्सूर अली खान यांच्यातील वाद बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच मन्सूर अली खान यांनी माफीनामा देत हा विनोद असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी मन्सूर यांना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्रिशाची माफी मागावी लागली होती. इतकंच नाही तर अभिनेत्रीवर मानहानीचा खटला दाखल करण्याचंही त्यांनी बोललं आहे. त्यामुळे त्रिशा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
मन्सूर अली खान यांनी नुकतीच त्रिशाची माफी मागितली होती. ज्यावर तिने माफीनामा स्वीकारला आणि लिहिले,’चुका करणे मानवी आहे, क्षमा करणे दैवी आहे. मात्र, मन्सूर अली खान यांचा नवा निर्णय समोर आल्यानंतर हा मुद्दा आणखी लांबणार असल्याचे दिसत आहे.’
दरम्यान, मन्सूर अली खान आणि त्रिशा यांनी लिओ चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली होती. चित्रपटात तृषासोबत एकही सीन शूट करू न शकल्याने मन्सूर अली खान यांनी अभिनेत्रीबद्दल असभ्य टिप्पणी केली होती. त्यांच्या वादामुळे सोशल मीडियावर चांगलाच खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर त्रिशाने ती भविष्यात मन्सूरसोबत काम करणार नसल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर त्रिशाच्या समर्थनात अनेक स्टार्सही समोर आले. मात्र आता या प्रकरणात मन्सूर अली खान तिच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर चाहते नाराजी व्यक्त करत आहे. या चर्चांवर त्रिशाने अधिकृतपणे कुठलेही भाष्य केलेले नाही.




