Trisha Krishnan: ‘प्रेमाशिवाय सगळं व्यर्थ’; तृषा कृष्णनच्या पोस्टमुळे विजयसोबतच्या नात्याच्या चर्चांना उधाण
Trisha Krishnan तृषाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक विचार शेअर केला, ज्यात ती म्हणते की, “प्रेम हे सर्वकाही नसतं, पण प्रेमाशिवाय सगळं काही अर्थहीन असतं.” या एका ओळीने सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेकांनी हा संदेश तिच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहायला सुरुवात केली आहे.

Trisha Krishnan: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन (Trisha Krishnan) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या एका क्रिप्टिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, या पोस्टनंतर तिचं नाव अभिनेता विजय याच्यासोबत जोडून पाहिलं जात आहे.
तृषाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक विचार शेअर केला, ज्यात ती म्हणते की, “प्रेम हे सर्वकाही नसतं, पण प्रेमाशिवाय सगळं काही अर्थहीन असतं.” या एका ओळीने सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेकांनी हा संदेश तिच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहायला सुरुवात केली आहे.
इतकंच नाही, तर तिने एक व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यात ती आयुष्याबद्दल वेगळा दृष्टिकोन मांडताना दिसते. त्या व्हिडीओमध्ये ती सांगते की, आता ती वाद घालण्यापेक्षा मनःशांतीला अधिक महत्त्व देते. “कोणी काहीही बोललं, जसं की ‘हत्ती उडू शकतो’, तरीही मी त्यावर वाद घालणार नाही. कारण प्रत्येकाला पटवून देणं आवश्यक नसतं, मनाची शांतता जास्त महत्त्वाची असते,” असा तिचा संदेश होता. हा विचारही अनेकांनी तिच्या सध्याच्या परिस्थितीशी जोडून पाहिला.
Trisha Krishnan
गेल्या काही दिवसांपासून तृषा कृष्णन आणि विजय यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा सुरू आहेत. दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या जवळीकतेबाबत अंदाज वर्तवले जात आहेत. या अफवांमध्ये आणखी भर पडण्याचं कारण म्हणजे विजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही काही बातम्या समोर आल्या आहेत. काही रिपोर्ट्सनुसार त्याची पत्नी संगीता हिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. Trisha Krishnan
दरम्यान, विजय सध्या त्याच्या राजकीय कारकिर्दीवरही लक्ष केंद्रित करत आहे. तो तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय झाला असून आगामी निवडणुकांसाठी तयारी करत आहे. दुसरीकडे, तृषा तिच्या करिअरवर लक्ष देत आहे. ती लवकरच ‘करुप्पु’ या चित्रपटात सूर्या सोबत झळकणार आहे.
तृषाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहत्यांना वाटतं की हा तिच्या वैयक्तिक आयुष्याचा इशारा आहे, तर काहींना तो केवळ एक सामान्य विचार वाटतो. मात्र, या पोस्टमुळे तिचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, हे नक्की. Trisha Krishnan





