Tripura : भारतात घुसणाऱ्या 12 रोहिंग्यांसह 16 जणांना अटक

आगरताळा – रेल्वे पोलीस दलाने आगरतळा रेल्वे स्थानकावर 12 परदेशी नागरिकांसह 16 जणांना बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.
गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) स्टेशन प्रभारी राणा चटर्जी यांनी सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे आरपीएफने तीन मुलांसह एकूण 16 जणांना स्टेशनवरून ताब्यात घेतले आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक, दोन बांगलादेशी आणि 10 रोहिंग्या आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये मधुपूर येथील अभिजीत देब नावाच्या मध्यस्थाचाही समावेश आहे. हे सर्वजण बांगलादेशातून अवैधरित्या भारतात दाखल झाले होते. आगरतळा रेल्वे स्थानकातून सकाळी कांचनगंगा एक्स्प्रेसने सर्वजण कोलकात्याला जाणार होते.
आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांच्यावर घुसखोरीचा विशेष गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/india-will-soon-become-hindu-rashtra-dhirendra-shastri/
पोलीस आरोपींची कसून चौकशी करत त्यांच्या अवैध अतिक्रमणाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.





